माझा आवडता सण दिवाळी || Marathi निबंध || Diwali Essay in Marathi |My fav...


                               माझा आवडता सण दिवाळी

दिवाळी हा हिंदूंचा एक मुख्य सण आहे . 
संपूर्ण  भारतात हा सण  खूप उत्साहाने साजरा केला जातो.
चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते . 
त्यावेळी लोकांनी घराघरात दिवे लावून त्यांचे स्वागत केले . 
हाच दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. 
दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे उठून ,सुगंधी उटणे आणि तेल लावून अभ्यंगस्नान करतात .
सर्व जण नवीन कपडे घालतात . 
घराबाहेर सुंदर  रांगोळी काढून घर सुशोभित केले जाते . 
घराबाहेर कंदील आणि दिव्यांनी रोषणाई केली जाते . 
सर्व कुटूंब एकत्र चकल्या ,लाडू ,चिवडा ,करंज्या अश्या फराळांचा आस्वाद घेतात . 
दिवाळीत गोवर्धन पूजा ,धनत्रयोदशी ,नरक चतुर्दशी , लक्ष्मीपूजन ,भाऊबीज हे दिवस  उत्साहाने साजरे केले जातात . 
लहान मुलांना शाळेला सुट्टी असते. फटाके फोडून मुले आपला हा सण खूप आनंदात साजरा करतात . 
मोठी माणसे एकमेकांना शुभेच्छा ,फराळ आणि भेटवस्तू देऊन आनंद साजरा  करतात . 
असा हा अंधकार मिटवून प्रकाश देणारा सण सर्वाना एकत्र आणतो .

********************************************************************************

रक्षाबंधन Essay in Marathi



                                 रक्षाबंधन

रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात मोठ्या आंनदाने  साजरा करतात . दरवर्षी श्रावण पौर्णिमेस हा सण  साजरा केला जातो म्हणून ह्या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात .रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचे अतूट नाते जोपासणारा सण आहे . ह्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून उजव्या हाताच्या मनगटावर  राखी बांधते . आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्य आणि भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊही आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो .आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला खास गोड पदार्थ बनवून  खाऊ घालते आणि भाऊही  बहिणीला भेटवस्तू  देतो . हा सण साजरा करण्यामागेही एक कथा आहे. असे म्हणतात कि महाभारतात श्री कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे रक्षण केले होते .ह्या बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक म्हणून आपण  हा सण  साजरा करतो .