रक्षाबंधन
रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात मोठ्या आंनदाने साजरा करतात . दरवर्षी श्रावण पौर्णिमेस हा सण साजरा केला जातो म्हणून ह्या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात .रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचे अतूट नाते जोपासणारा सण आहे . ह्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते . आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्य आणि भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊही आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो .आजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला खास गोड पदार्थ बनवून खाऊ घालते आणि भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो . हा सण साजरा करण्यामागेही एक कथा आहे. असे म्हणतात कि महाभारतात श्री कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे रक्षण केले होते .ह्या बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक म्हणून आपण हा सण साजरा करतो .
No comments:
Post a Comment