माझा आवडता सण दिवाळी || Marathi निबंध || Diwali Essay in Marathi |My fav...


                               माझा आवडता सण दिवाळी

दिवाळी हा हिंदूंचा एक मुख्य सण आहे . 
संपूर्ण  भारतात हा सण  खूप उत्साहाने साजरा केला जातो.
चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते . 
त्यावेळी लोकांनी घराघरात दिवे लावून त्यांचे स्वागत केले . 
हाच दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. 
दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे उठून ,सुगंधी उटणे आणि तेल लावून अभ्यंगस्नान करतात .
सर्व जण नवीन कपडे घालतात . 
घराबाहेर सुंदर  रांगोळी काढून घर सुशोभित केले जाते . 
घराबाहेर कंदील आणि दिव्यांनी रोषणाई केली जाते . 
सर्व कुटूंब एकत्र चकल्या ,लाडू ,चिवडा ,करंज्या अश्या फराळांचा आस्वाद घेतात . 
दिवाळीत गोवर्धन पूजा ,धनत्रयोदशी ,नरक चतुर्दशी , लक्ष्मीपूजन ,भाऊबीज हे दिवस  उत्साहाने साजरे केले जातात . 
लहान मुलांना शाळेला सुट्टी असते. फटाके फोडून मुले आपला हा सण खूप आनंदात साजरा करतात . 
मोठी माणसे एकमेकांना शुभेच्छा ,फराळ आणि भेटवस्तू देऊन आनंद साजरा  करतात . 
असा हा अंधकार मिटवून प्रकाश देणारा सण सर्वाना एकत्र आणतो .

********************************************************************************

No comments:

Post a Comment